प्रेम

प्रेम शब्दावर येऊन
अडकून बसणं म्हणजे प्रेम
दोन मनांना जोडलेल्या शब्दात
गुंतुन बसण म्हणजे प्रेम

छोट्याशा कारणाने त्याची
आठवण येणं म्हणजे प्रेम
आठवण कधी येत नाही तिची
तिला न विसरणं म्हणजे प्रेम

आयुष्य चालण्य़ाची प्रेरणा
नवा श्वास देणं म्हणजे प्रेम
कायमची सोबत असल्याचा
विश्वास देणं म्हणजे प्रेम

मनानं विचार करणं
शब्दात जगणं म्हणजे प्रेम
अर्धी रात्र बोलणं बसणं
खुळ्यागत वागणं म्हणजे प्रेम

कधी प्रेमाच्या नावाने
खुप खुप भांडण म्हणजे प्रेम
नुसताचं आवाज ऐकून
मनाला जाणणं म्हणजे प्रेम

कधी भावूक होऊन
शब्द अवघडणं म्हणजे प्रेम
ती मुसमुसू लागल्यावर
माझ रडणं म्हणजे प्रेम

कधी उगाचं खटयाळपणे
तिला छळणं म्हणजे प्रेम
तिला होणा-या त्रासाने
जीव जळणं म्हणजे प्रेम

एका क्षणात प्रेमविश्वात
रमणं म्हणजे प्रेम
हळवी माऊ, खट्याळ बोक्याची
जोडी जमणं म्हणजे प्रेम

प्रेम नावाची कवीता
पुरी करणं म्हणजे प्रेम
सगळ्यांसाठी जगूनसुद्दा
तीचा उरण म्हणजे प्रेम

होईल ते पाहता येईल म्हणुन
चालतं राहणं म्हणजे प्रेम
एकमेकांना भेटण्याची
वाट् पाहणं म्हणजे प्रेम

कोकण किनारा सोबत फ़िरण्याची
स्वप्न म्हणजे प्रेम
'तु अन् मी' ला फुलासारखं
जपण म्हणजे प्रेम

No comments: