दु:खाच्या डोंगराखाली
दबलेल ते बालपण
रोजचं होता वैशाख
कधी दिसलाचं नाही श्रावण
नव्हता आपल्यांचा आपलेपणा
नव्हती भाग्याची साथ
लेकराच्या डोक्यावर ठेवायला
नव्हता मायेचा तो हात
कधी नाही पाहीली बासुंदी
कधी पाहिला नाही मुरंबा..
बहीण बापुडी काय करणार
नव्हता बापाचाही खांदा.
जेव्हा मला माय
सोडुन निघुन गेली
डोळ्यातली ओली
आसवं सुकुन गेली.
कधी कधी ते एकटेपणाचं सावटं
मनात काहुर माजवायचं
माय परत येईल
भोळ मन स्वप्न सजवायचं
बालपण सारं गेलं
वेदनांच्या सागरात बुडुन
मग संस्कारांचा
मऊपणा येणार तरी कुठुन
नव्हती मायेची सावली
नव्हता प्रेमाचा गारवा
सुकून गेलं रोपट
पण मिळला नाही ओलावा
आज ही दुःखाची सावट
तशीचं राहीली
कधी मायेचा उबारा
कधी माया नाही पाहीली
नको धनदौलत नको संपत्ती
कशावरचं आशा ठेवली नसती
देवाने काही मागायला सांगितलं असतं
तर मी "आई मागितली असती"
No comments:
Post a Comment