कितीही दुर आलो जरी
तरीही तुझ्या सोबत मी,
सखे रडणं थांबवं आता
तुझ्या हसण्यात सुद्दा मी
डोळे ओले माझेही झाले,
अस्वस्थ झालो अन् नाराज,
पण उद्या भेटणं आहेचं नक्की,
जरी दुर झालो आज
अंतरामध्ये मोजलं तर,
दुरावा खुप मोठा आहे,
पण हा दुरावा खुप लहान आहे,
कारण तु माझ्या अंतरात आहेस
कधी हसवून मला हसवणारी,
स्वतः रडून मला भिजवणारी,
प्रेयसीचं नातं जपतानाचं,
बायकोसारखं प्रेम करणारी
तुझ्या डोळ्यातला प्रत्येक थेंब,
कसा काय सांग वाया जाईल,
जपुन ठेव तुझ्या अश्रुधारा,
लग्नामध्ये त्याचा उपयोग होईल.
हा तात्पुर्ता दुरावा आहे,
समजुन घेईल माझं गोड बाळ,
दिसा मागे दिस बुडुन
सरुन जाईल हा काळ
घडयाळाचे काटे आहोत आपण,
दिशांनी वेगळे सोडलेले,
काही क्षणासाठी बोलतो आपण,
पण ह्रदयापासुन जोडलेले
2 comments:
great yaar mast kavita ahe tujhi
Thanks da ..
Post a Comment